0%

हळद लावणे

haladi

हा विधीही लग्नाच्या दिवशीच सकाळी करतात. तेल उटणे लावून झाल्यावर वधू व तिचे आई-वडील यांना हळद लावतात. हळदीची पूड पाण्यात कालवून ती चेहरा व हातपायांना लावण्याची पध्दत आहे. त्यावेळी प्रसंगानुरूप गाणीही गातात व नंतर त्यांना मंगल स्नान घालतात. त्यानंतर कालवलेल्या हळदीतील उरलेली हळद ( उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वाजत-गाजत वराच्या
बि-हाडी जातात. तिथे वराला व त्याच्या आई-वडिलांना हळद लावून स्नान घातले जाते. वधूपक्षाकडून हळद घेऊन येणा-या सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरून , फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य होते. वरपक्षाकडून वधूला हळदीची म्हणून उंची साडी देण्यात येते.
शेतकरी वर्गामध्ये हळदी समारंभाला फार महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा विधी खूप वेळ चालतो व तो आदल्यादिवशीच करतात. यावेळी काही विनोदी, वधु-वरांची मस्करी करणारी, किंवा भावनोत्कट अशी गाणी म्हंटली जातात. वधू- वर व तिचे-त्याचे आई-वडील यांना मध्ये बसवून त्यांच्याभोवती फेर धरून थोडेसे नाचून गाणी म्हंटली जातात व त्यांना ओवाळतात. आरतीत मुलीचे किंवा मुलाचे आई-वडील पैसे घालतात व ते ओवाळणा-या सुवासिनींमध्ये वाटून घेतले जातात. हळदीसाठी जमलेल्यांना मटणाचे जेवण देतात